अपंग बेरोजगाराचे कर्ज प्रकरण मंजूर करा अन्यथा बँकाना घेराव घालणार

0
365

 

हंसराज उके अमरावती

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा

अमरावती..शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगाराना रोजगारासाठी बीज भांडवलं योजना सुरु असून या योजने मध्ये अपंग बेरोजगार यांना एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज मिडते यामध्ये शासना कडून 30 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते व एक लाख वीस हजार बँक देते असे एकूण एक लाख पन्नास हजार मंजूर झाल्यावर बँक मार्फत अपंगांना देण्यात येत असून अमरावती जिल्ह्यात अनेक अपंग बेरोजगार यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभागात अर्ज केले आहे व त्यांनी सर्व अर्ज तपासून संबंधित बँकना मंजूर साठी पाठविले आहे पण बँक ये अपंग बेरोजगार यांना कर्ज मंजूर करत नाही आहे व त्यांना उडवा उडवीचे उत्तर देऊन त्याची दिशा भुल करत आहे
अपंग बेरोजगार यांनी पैसे खर्च करून कर्ज प्रकरण तयार केले व अपंग विभाग दिले पण बँक मॅनेजर याचा उडवा उडवीचे उत्तर मुडे अपंगांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून दिनांक 15 /04 / 2021 परंत अपंग बेरोजगार चे बँक ने कर्ज मंजूर केले नाही तर अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती चा वतीने संबंधित बँका ना अपंग घेराव आंदोलन करणार असा इशारा अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here