गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:
भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते, या आनंदात आयोध्यामध्ये दारात विजयाची गुढीउभारून त्यांचे स्वागत केले होते. हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.त्याच प्रमाणे यावर्षी स्थानिक जळगांव जामोद शहरातील सुप्रसिद्ध वाकेकर हॉस्पिटल तर्फे लसीकरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी गुढी उभारून जनजागृती केली. यावेळी कोरोना विषाणू चा नायनाट करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. आपल्या भारतात आज घडीला कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. तरी सर्व जनतेने मनात कोणत्याही शंका कुशंका न ठेवता, कोणताही संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे व शासनाच्या या उपक्रमाला आपली नैतिक जबाबदारी म्हणून हातभार लावावा असे आव्हान केलं. यावेळी वाकेकर हॉस्पिटल चे संचालक डॉ. संदीप वाकेकर व डॉ.सौ.स्वाती वाकेकर यांनी रीतसर पूजा करून सुख समृद्धी व सदृढ आरोग्यची गुढी उभारली व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.मागील वर्षी सुद्धा कोरोना योद्ध्यांचे आभार व्यक्त करणारी गुढी उभारून आगळा वेगळा संदेश दिला आहे.