डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घरोघरी जाऊन केले बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे वाटप – संग्रामपूर मित्र परिवार

0
298

 

दि.14 एप्रिल 2021 रोजी संग्रामपूर शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष जनसेवक मा.शंकरभाऊ पुरोहित यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे बौध्द समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.सर्वप्रथम संग्रामपूर येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे हारार्पण करून पूजन करण्यात आले.त्यांनतर संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष जनसेवक मा.शंकरभाऊ पुरोहित,प्रवक्ते हमीद पाशा, रवी पहुरकर आणि राहूल शिरसोले यांनी आपले विचार मांडून डॉ.बाबासाहेब यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.त्यावेळी शंकरभाऊ पुरोहित म्हणाले पुढच्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीला संग्रामपूर शहरामध्ये दिवाळी साजरी झालीच पाहिजे आणि त्यांचे विचार आत्मसात आणणे गरजेचे झाले आहे असे संबोधित केले.त्यावेळी संग्रामपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक,संग्रामपूर मित्र परिवाराचे सदस्य आणि समस्त बौध्द समाज बांधव उपस्थित होते.त्यांनतर सामूहिक मानवंदना करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here