Home Breaking News कंटेनरने उपजिल्हा रुग्णालय चौकात पायदळ जाणाऱ्या युवकास चिरडले

कंटेनरने उपजिल्हा रुग्णालय चौकात पायदळ जाणाऱ्या युवकास चिरडले

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 29.4.21

स्थानिक उपजिल्हा रुग्णालय येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उडान पुल चढतांना नागपुर कडून हैदराबाद कडे जाणाऱ्या कंटेनरने पायदळ जाणाऱ्या भोजराज रामचंद्र घाटुडे राहणार संत तुकडोजी वार्ड वय ३५ हा सरकारी उपजिल्हा रुग्णालयाकडे जातांना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने क्रमांक N.N.01AB1069 ने चिरडले. हा अपघात सकाळी 10.15 चे दरम्यान घडला असून कंटेनर हिंगणघाट पोलिसांनी दारोडा टोल नाक्यावरुन पकडला त्यावेळी चालक व वाहक कंटेनर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा हा कंटेनर दारोडा टोल नाक्यावरुन हिंगणघाट पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पी.एस.आय.गंगाधर पेन्दोर, महेंद्र आकरे, दिपक मस्के, करीत आहे.