पत्याच्या  जुगारावर धाड टाकणाऱ्या पोलिसांनाच पकडलेल्या एका आरोपीने धक्काबुक्की , शिवीगाळ

0
567

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

पत्याच्या  जुगारावर धाड टाकणाऱ्या पोलिसांनाच पकडलेल्या एका आरोपीने धक्काबुक्की , शिवीगाळ  केल्याची घटना आज तालुक्यातील बोरावलं  खुर्द   येथे घडली .

पो नि सुधीर पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना बोरावलं येथे  पत्याच्या  जुगारावर धाड टाकण्याची सूचना केली होती . त्यानुसार २ पंचांसह खाजगी वाहनाने पो उ नि विनोद खांडबहाले , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पो  कॉ  सुशील घुगे , भूषण  चव्हाण , राजेश  वाडे , निलेश वाघ ,  अस्लमखान दिलावरखान  ,  होमगार्ड विजय जावरे , भूषण निंबाळकर , पंकज कोळी , आकाश कोळी , मयूर तायडे , लोकेश चौधरी हे धाडीच्या कारवाईसाठी बोरावलं खुर्द येथे गेले होते .  तेथे शांताराम धनगर यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत हा पत्याचा जुगार  खेळला जात होता पोलिसांनी धाड टाकल्यावर पकडलेल्या आरोपींपैकी खेमचंद  वारूलकर  याने  अस्लमखान दिलावरखान व सुशील घुगे यांना आरडाओरड करीत आम्हाला सगळ्यांना आताच्या आता सोडा नाहीतर तुम्हाला येथून कुणालाच कुठेच जाऊ देणार नाही असे म्हणत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली

त्यानंतर पो कॉ अस्लमखान दिलावरखान यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आरोपी  खेमचंद  वारूलकर याच्या विरोधात भा द वि कलम ३५३ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here