अजहर शाह
केंद्राकडून कोविड केअर ला 31 वेंटिलेटर व ओक्सिजन स्टोरेज प्लांट ची मदत
रतन टाटा यांच्या भरीव मदती साठी मानावे तेवढे आभार कमी..
लोकनेते विजयराज शिंदे
अधिकारी,कर्मचारी व भाजपा पदाधिकारी यांच्या समवेत सर्व रुग्ण वार्ड,विविध यंत्रणा यांची घेतली माहिती
बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्या कोरोनाने थैमान माजविले असून आरोग्य यंत्रनेवर त्याचा ताण पड़त आहे. रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची रेमेडिसिव्हीर,ऑक्सीजन- वेंटिलेटर बेड यांच्यासाठी होणारी वाताहात यामुळे अनेक रुग्णाचे मनोधैर्य खेचुन त्यातच अनेक रुग्णानी आपले जीव गमावले आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.आमदार विजयराज शिंदे यानी आज 6/5/2021 रोजी बुलडाणा जिल्हयातील मुख्य कोविड सेंटर बनलेल्या स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल व बाजुच्या क्षय आरोग्य धाम मधील कोविड हॉस्पिटल यांना भेट देऊन आरोग्य यंत्रनेची सविस्तर पाहणी करून माहिती घेतली त्याच प्रमाणे रुग्णाशी स्वतः संवाद साधला.
पाहणी करते वेळी, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन वासेकर यांच्यासह भाजपा चे तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,मंदार बाहेकर,अनंता शिंदे ई पदाधिकारी त्यांच्या समवेत संपूर्ण कोविड हॉस्पिटल ची पाहणी केली.
सदर कोविड हॉस्पिटलची 220 एवढी रुग्ण क्षमता असून संख्या असून लवकरच 250 रुग्ण क्षमता होणार आहे त्याच प्रमाणे मुकबधिर विद्यालय कोविड केअर सेंटर येथे 100 बेड,तर क्षय आरोग्य धामच्या इमातीत 90 बेड,जिजामाता मुलींचे वस्तिगृह येथे 100 बेड असे एकून जवळपास 550 रुग्ण कोविड हॉस्पिटल ला उपचार घेऊ शकतील एवढी क्षमता बुलडाणा जिल्हा मुख्यालयी उपलब्ध आहेत, मात्र तरी सुद्धा ऑक्सिजन व वेंटिलेटर बेड कमी पड़त असल्याने रुग्णा ची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.त्यामुळे ओक्सिजन बेड वाढविन्याची मागणी यावेळी विजयराज शिंदे यांनी केली आहे. स्त्री रुग्णालयाची ही इमारत सुसज्ज असून सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे,याबाबत समाधानी असल्याचे सांगत मुकबधिर विद्यालयाच्या कोविड केअर सेंटर बाबत विविध तक्रारी असून त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्याची सूचना लोकनेते विजयराज शिंदे यांनी केली आहे.
या प्रसंगी लोकनेते विजयराज शिंदे यांना रुग्ण उपचार घेत असलेल्या सर्व वार्ड मध्ये भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली व रुग्ण व नातेवाईक यांच्याशी संवाद साधुन त्यांना धिर दिला व हॉस्पिटल च्या व्यवस्थे बद्दल समाधान व्यक्त केले.स्वयंपाक गृहाची सुद्धा पाहणी करून रुग्णाना मिळणारे जेवन,नास्ता,दूध इतर बाबत परिपूर्ण माहिती घेऊन आज बनलेल्या जेवनाची पाहणी केली.
रुग्णाना लागणाऱ्या ऑक्सिजन व्यवस्थे बाबतही लोकनेते विजयराजजी शिंदे यानी माहिती घेऊन साठयाचे नियोजन बाबत माहिती घेतली. यावेळी केंद्र शासनाच्या भरीव मदतीने जिल्ह्याला ऑक्सीजन स्टोरेजचा प्लांट उभरल्या गेल्या असून यामुळे रुग्णाना गरजे नुसार योग्य ऑक्सीजन उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्याच प्रमाणे उपचारासाठी अत्यंत महागड्या असणाऱ्या 31 वेंटिलेटर ची मदत सुद्धा यावेळी केंद्राणी केल्याची माहिती प्राप्त झालेया आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रने कड़े रेमेडिसीवीर चा मुबलक साठा :-
खासगी हॉस्पिटल मध्ये रेमेडीसिविर चा तुटवडा जाणवत असला तरी शासकीय कोविड हॉस्पिटल मध्ये रेमेडीसिविर मुबलक आहे. मागील वर्षीच दूरदृष्टि ठेवून 10,000 रेमेडिसिवीर उपलब्ध करून घेतल्याने सद्य स्थितीत रुग्णाना हा तूटवडा जाणवत नसल्याची माहिती डॉ.वासेकर यांनी दिली. त्यांच्या या दॄष्टिमुळे आज किमान शासकीय व्यवस्थेत गरीब रुग्णाना महागड़े रेमेडीसीवीर मोफत उपलब्ध होत आहे.डॉ.वासेकर ,त्यांचे आरव सहकारी व जिल्हा शल्य चिकित्सक,सर्व आरोग्य आरोग्य अधिकारी यांच्या नियोजनाचे लोकनेते विजयराज शिंदे यांनी विशेष कौतुक केले.कोरोना रुग्णांना सेवा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नगरसेवक अरविंद होंडे व मंदार बाहेकर यांचेही कार्य कौतुकास्पद असल्याची भावना बोलून दाखविली त्याच प्रमाणे श्री.रतनजी टाटा यांच्या माध्यमातून स्त्री रुग्णालयास मिळालेल्या भरीव मदतीमुळे आहे रुग्णाना अद्ययावत सेवा मिळत आहे त्यांच्या हया मदतीसाठी मानावे तेवढे आभार कमी असल्याचे प्रतिपादन लोकनेते विजयराज शिंदे यांनी केले आहे.







