Home Breaking News स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त हिंगणघाट वंजारी समाज सेवा संघातर्फे विविध कार्यक्रमाचे...

स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त हिंगणघाट वंजारी समाज सेवा संघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
274

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.३.6.21
बहुजनांच्यासाठी हक्कासाठी लढनारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी समाज सेवा संघ हिंगणघाट शाखेच्यावतीने शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील स्व.गोपीनाथजी मुंडे बाल उद्यान तसेच बिडकर वार्ङ येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वंजारी समाज सेवा संघाचेवतीने ५१ झाडे लावून माजी उपमुख्यमंत्री मुंडे यांचे स्मृतिस अभिवादन करण्यात आले.
वंजारी समाजसेवा संघाचे महिला आघाडीचेवतीनेसुद्धा स्व.मुंडे यांचे पुण्यतिथिदिनी शहरातील नेहरू वार्ड येथील जलारामबाप्पा मंदिर परिसरात गरीब,निराधारांना अन्नदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here