अजहर शाह
मोताळा:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या अनेक समाजघटकांना आपल्या मदतीची गरज आहे. टीम परिवर्तन मुंबई व जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन मलकापूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या २० गरजू लोकांना किराणा किटचे वाटप दि. १ जुनं रोजी करण्यात आले. या किटमध्ये तूर डाळ, मुगाची डाळ, सोयाबीन वडी, शेंगदाणे, ५ किलो चक्की आटा, पार्ले बिस्किट बुडा, राजगीरा लाडू, टाटा साॅल्ट, डेटाॅल साबन, खाण्याचे तेल, व्हिल साबन, निहार तेल इ साहित्य देण्यात आले. यामध्ये पिंपळपाटी येथील श्री.वामन फकिरा गायकवाड, सौ.शांताबाई धनाजी गायकवाड, देवचंद्र रामचंद्र सोनोने, राधाबाई तुळशीराम गवळी, जैवंताबाई फकिरा गायकवाड, शारदाबाई दिपाजी गायकवाड, तसेच तळणी येथील तळणी गं.भा नलुबाई वसंत खर्चे, गुंफाबाई बिसन अंभोरे, गंगुबाई पंढरी वाढे, सरस्वती वसंत वाघ, रुख्माबाई निना वानखेडे, त्याप्रमाणे शेलापूर येथील शांताबाई रामभाऊ महाले, केसरबाई सिताराम सावळे अश्या गरजू कुटूंबाना किराणा वाटप करण्यात आले. या वाटपासाठी टिम परिवर्तनचे तुषार वारंग व जाणीव फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रांजलीताई धोरण, सचिव मनोज यादव, कोषाध्यक्षा दिपाली सोनोने, सदस्य गोपाल पाटील, रोशन तायडे, पत्रकार गणेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते सारंगधर घाटे पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.







