गजानन सोनटक्के
जळगाव जा:-_
सूनगाव परिसरातील उसरा शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस सुरू केल्यामुळे हरीण व रोही नुकतीच लागवड केलेल्या कपाशी पीक फस्त करीत आहे त्यामुळे उसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहरींना पाणी कमी असल्याने सदर शेतकऱ्यांनी 12 ते 15 दिवसापुर्वीच ठिबकच्या साहय्याने कपाशीची लागवड केली आहे परंतू कपाशीचे जमिनिवर आलेले कोवळे पिकांसह ईतरही भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी कमालीचे संकटात सापडून गेले आहेत.अद्यापही पाऊसाचा पत्ताच नाही पेरलेल्या कपाशींच्या पिकांना ठिबक च्या सहाय्याने कसे -बसे रात्री -बेरात्री विहरीत थोडेपार असलेले पाणी देवुन पिके शेतकरी वाचवित आहेत , कोवळी कपाशीची रोपे जमिनीवर येताच माकडांसह हरिण व रानडुकरे रातभरातून कोवळ्या कपाशीचे शेंडेच खूरतडून फस्त करीत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त होवून गेले असून शेतकऱ्यांसमोर आता हे वन्यप्राण्यांचे संकट उभे ठाकले आहे सातपुडा पर्वतातून हरीणांसह रोही रानडुकरांच्या कळपांनी आपला मोर्चा शेतातील पिकांकडे वळविला असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान कमी करण्याकरीता शेतकरी बूजगावने व ईतर पारंपारिक उपाय करीत परंतू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेत जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त प्रमानात वाढत असल्याने शेतातील पिकांचे नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात २५ ते ३० हरणांचे कळप कपाशीचे पिकात घुसून कपाशीचे उभे पिक फस्त करीत आहे या मुळे शेतकऱ्यांना नव्याने पुन्हा कपाशी पिकाची लागवड करावी लागत आहे आतातरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शिवारातील हरीण रोही रानडुकरांचे कळपांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी उसरा परिसरातील। शेतकरी करीत आहेत.







