यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा जनहित चेतन अढळकर यांच्या हस्ते व प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील बोरावल गेट परिसरातील आदिवासी वस्तीतील लहान चिमूकल्या मुलांसोबत सकस आहार अंडी केळी बिस्किट काजू बदाम असा पोस्टीक आहार वाटप करून आज दिनांक १४ जुन ठाकरे रोजी वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला, याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी विपुल येवले, प्रतीक येवले, विभागाध्यक्ष आबिद कच्छी , राज शिर्के, आकाश चोपडे ,वैभव दांडेकर, खुशाल चौधरी, ओम लोणारी ,गोलू भोई यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व आदींनी कार्यकर्त्यात्यांसह उपस्थित राहुन कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पारिश्रम घेतले . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथम या आदीवासी वस्तीवरील गोरगरीब कुटुंबांतील चिमुकल्या लहान मुलांना सकस आहार वाटप करण्यात आल्याने मुलांच्या कुटुंबांनी मनसे चेरावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर व त्यांच्या सैनिकांचे मनपुर्वक आभार मानले.







