ओबीसींच्या समर्थनार्थ भाजपाने जाम येथील राष्ट्रीय महामार्गावर रोखली २ तास वाहतुक

0
327

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२६ जून
ओबीसींच्या न्याय्य मागण्या सरकारने मान्य कराव्या या मागणीसाठी समुद्रपुर तालुक्यातील जाम येथे भाजपाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार,विधानपरिषद सदस्य डॉ.रामदासजी आंबटकर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करीत ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली.
सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान शेकडो पक्षकार्यकर्ते
आंदोलनस्थळी उपस्थित होत तब्बल २ तास राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक रोखुन धरली होती,
आमदार समीर कुणावार ,माननीय आमदार रामदासजी आंबटकर, जिल्हा भाजपा महामंत्री किशोर दिघे, हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंताणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद मृणालताई माटे, पंचायत समिती सभापती सौ. सुरेखाताई टिपले हिंगणघाट पंचायत समिती सभापती शांताताई आंबटकर, वसंतरावजी आंबटकर, तालुका अध्यक्ष संजय डेहने, तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, हिंगणघाट शहर अध्यक्ष आशिष पर्बत, समुद्रपूर नगराध्यक्ष गजु राऊत, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, माजी प. स. सभापती गंगाधरजी कोल्हे, पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, तुषार आंबटकर , कैलासजी टिपले, सुनील डोंगरे , बिस्मिल्ला खान, अनिल गहरवार , वामनराव चंदनखेडे , कवीश्वर इंगोले , रोशन रोशन पांगुळ , चंदू भमाळवे विनोद विटाळे, सरपंच नितीन वाघ , सुभाषजी कुंटेवार, सिंधी रेल्वे नगर परिषद अध्यक्षा बबीताताई तूमाने ,ओम प्रकाश राठी, जयंत बडवाईक ,अमोल गवळी ,मनोज पेटकर ,देवा कुबडे, राकेश शर्मा, किशोर रोंगे, दिनेश वर्मा ,शिवाजी आखाडे, कैलास टिपले, वामनराव चंदणखेडे उपस्थित तथा मतदार संघातील सर्व सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलना दरम्यान पोलिसांनी आमदार कुणावार, आमदार आंबटकर यांचेसह सर्व आन्दोलकांना ताब्यात घेतले,नंतर पोलिसांनी त्यांची मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here