यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या निषेर्धात सर्वाच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आले . संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षल गोविंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , यावल पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरुजीत चौधरी , मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चे चेअरमन शरद जिवराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी , पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी , यावल नगर परिषदचे नगरसेवक डॉ . कुंदने फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील , उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला . यावेळी राज्य शासनाच्या विरूद्ध भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनात भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्वक्ष हर्षल पाटील ,नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी , मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन यांनी आघाडी शासनाविरूद्ध चौफेर हल्ला चढविला .







