Home Breaking News कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत सूनगाव येथे पीक उत्पन्न वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत सूनगाव येथे पीक उत्पन्न वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव येथे आज दिनांक 29/6/2021 रोजी कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत , पिकाचे उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँक शेतकरी(नावीन्यपूर्ण
उपक्रम राबविणारे) सहभाग कार्यक्रम राबविण्यात आला ,उपरोक्त कार्यक्रम सुनगाव येथे श्री मोहनसिंह राजपूत यांचे शेतात आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रम प्रसंगी मका पिकाचे उच्चतम उत्पन्न घेणारे श्री मोहनसिंह राजपूत यांनी मका पिकाचे पेरणी पासून ते काढणी पर्यन्त चे त्यांचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले, पट्टा पद्धत वापरून ठिबक वर एका एकरमध्ये त्यांनी 40 क्विं मका उत्पादन घेतले आहे,कार्यक्रम प्रसंगी शेतकरी वसंत कल्पांडे,शिवलाल चव्हाण, किशोर येऊल,शाबीर तडवी हे उपस्थित होते, तसेच कृषी विभाग जळगाव जामोद येथील कृषि पर्यवेक्षक श्री. पी. के .बंड सर,व कृषि सहायक एस .एस. सिनगारे मॅडम सुनगाव ह्या उपस्थित होत्या.