Home Breaking News कांग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात...

कांग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेला झाली सुरुवात…

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.तालुका प्रतिनिधी
:-
दिनांक 11 जुलै रविवार रोजी जळगाव जामोद शहर आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच दररोज वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात झाली आहे दररोज वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे भाव तसेच गॅस दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाली असून या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे यानिमित्ताने केंद्र सरकारच्या निषेधार्थ या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली अभिजीत अवचार युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद पाटील अध्यक्ष निशिकांत देशमुख युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल राजीक, स्वप्नील देशमुख राजू मुल्लाजी मन्सूर शेख इम्रान भाई शेख जुनेद,मयूर हारीस, शफिक भाई अमोल मानकर दिनेश काटकर, हुसेन राही ,अब्रार अवेस भाई यांनी या स्वाक्षरी मोहीमेत जळगाव जामोद येथील पेट्रोल पंपावर सहभागी होऊन या इंधन दरवाढीविरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन केंद्र शासनाचा महागाईच्या विरोधात निषेध केला.