संग्रामपूर प्रतिनिधी
वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व सचिवाला 29 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टर खूप चांगली रुग्णसेवा देत आहेत. परंतु रात्रीच्या वेळी गावातील अत्यावश्यक रुग्णांसाठी आपले दवाखाने उघडत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने रुग्णांचे नातेवाईक उसनवारी करून शेगाव, अकोला, खामगाव आदी गावाला खाजगी वाहनाने भाडे व वेळ खर्च करून उपचारासाठी जातात . त्या कारणांमुळे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास होत जावे आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जोपासून वरवट बकाल येथील डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी. अनयथा आंदोलन करण्याचा इशारा शेकडो नागरिकांनी दिला आहे. शासनाने कोविड 19 च्या विषाणूमुळे रुग्णांना सुरळीत रुग्णसेवा मिळावी यासाठी खाजगी दवाखाने 24 तास सुरू ठेवण्यासाठी कडक निर्बन्ध लावले आहेत. शासनाच्या अधीन राहून वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर शेख अनिस, प्रल्हाद दातार, गोपाल इंगळे, नारायणराव ढगे, दिगम्बर बावस्कर, शेख कारीस, अर्जुन ढगे, रमेश डाबरे, गजानन ढगे, काशिराम ढगे, शेख निसार, लक्ष्मण भोपळे, विनायक टाकलकार, वासुदेव माकोडे, शेख शरीफ, अशोक डाबरे, दीपक दामधर, अभिजित पवार, वैभव डाबरे, चेतन बकाल सह 65 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा द्यावी अन्यथा त्यांचे दवाखाने बंद पाडू
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे रात्री अपरात्री नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी दिवसरात्र सेवेचे व्रत घेतलेले असते असे असताना जे डॉक्टर रात्री अपरात्री आजारी पडणाऱ्या रुग्णांना दवाखाने बंद करून रुग्णसेवा नाकारनाऱ्या डॉक्टर विरुद्ध तीव्र आंदोलन करून अशा डॉक्टरांचे कायमस्वरूपी दवाखाने बंद करणार.
प्रल्हाद दातार संस्थापक अध्यक्ष नागरिक हक्क बचाओ आंदोलन.
निवेदनाच्या प्रति
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा, संग्रामपूर तहसीलदार
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तामगाव यांना दिल्या आहेत.







