संभाजीनगर / औरंगाबाद
शिवसेना प्रवक्ते,जिल्हाप्रमुख , आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर बॉल्क बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटिल, बाळासाहेब दानवे, प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आपेगाव परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी चांगला रस्ता व्हावा यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेऊन जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाची त्वरित सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित, ज्ञानेश्वर नवले, संचालक श्रीलाल गायकवाड, संतोष भाऊ जोशी, लक्ष्मण बहिर, प्रवीण काळे, गोविंद वल्ले, विभागप्रमुख प्रदीप सोनवणे मा सरपंच मनसुख जाधव मच्छिंद्र शेवगट रामेश्वर जाधव चंद्रकांत जाधव अशोक जाधव कृष्णा जाधव अशोक घोगरे नितीन आढाव रामेश्वर जाधव सतीश जाधव चव्हाण मॅडम ग्रामसेवक आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.