ल
दि.9ऑगस्ट
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक सुविधेच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आज क्रांती दिनाच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी राष्ट्रधवज तिरंग्याचे पूजन व प्रणाम करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबसाहेब आंबेडकर, अमर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी या उपोषणाला निसर्गमित्र चेतन काळे हे सुद्धा या तीन दिवसांच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत.
या उपोषणासंदर्भात येथील उपजिल्हा रुग्णालयात पूर्णकालीन प्रसूती तज्ञ,फिजिशियन,परसेवेवर अन्यत्र असलेल्या दोन्ही डॉकटर यांना येथे रुजू करण्यात यावे,रेडिओलाजिस्टची नियुक्ती करण्यात यावी,व कायम स्वरूपी पोष्टमार्टेम् करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी गजू कुबडे यांनी तीन दिवसाचे उपोषण सुरू केले आहे.
या उपोषण मंडपात आज सकाळपासून जिल्हा प्रमुख जयंत तिजारे,प्रमोद म्हैसकर, ता.प्रमुख समुद्रपूर, मोहन पेरकुंडे, जगदीश तेलहांडे ता.प्रमुख हिंगणघाट,सूरज कुबडे,समीर मानकर,राजेश लखणी,विनोद खंडाळकर,दिवाकर वाघमारे,अजय लढी,विनोद धो बे,संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे,नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,मंगेश मिस्किन,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे, तबरेज पठाण,सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे,राहुल चौधरी,रितेश गुदढे प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्या मराठी साठी सचिन वाघे वर्धा







