गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद, अखिल भारतीय काँग्रेस असंघटित कामगार संघटना जिल्हा बुलढाणा च्या वतीने सोमवार रोजी उप विभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले कि अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेस च्या वतीने ९/८/२०२१ ला कामगारांच्या हक्कांसाठी संसद भवन दिल्लीला घेराव घालण्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार काँग्रेस बुलढाण्याच्या वतीने मागण्यांची पुर्तता होण्यासाठी जिल्हास्तरावर निवेदन देण्यात आले की खालील मागण्यांची पुर्तता होण्यासाठी कार्यवाही करावी, असंघटित कामगार काँग्रेस च्या मागण्या खालील प्रमाणे आहेत, १ शहरी रोजगार हमी कायदा अंमलात आणावा, २ मनरेगा योजने मधील माफिया गिरी संपुष्टात आणावे, ३-प्रवासी मजुर व कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, ४-असंघटीत कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यात यावी, ५- असंघटित कामगार मंडळामध्ये कामगारांची नोंदणी प्रकिया त्वरित सुरू करावी, ६- केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदा रद्द करावा,वरील मागण्या ची पुर्तता होण्यासाठी निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थितांमध्य हाजी मुज़म्मिल अली खान माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अल्प संख्याक विभाग, बाबु जमादार माजी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी जळगाव जामोद, गोविंदा इंगळे माळी समाज नेते नांदुरा,अजय राजपूत, इमरान खान, अ. राज़ीक, शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, राजु शेख शहर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, हारिस भाईजी, मंसुर शेख, अमान खान, इमरान खान, शेख ईरशाद, निसार भाई, कादर खान, रशीद ठेकेदार, न्ईम शेख, ज़हिर शेख, राजा जमदार,, मुदस्सिर भाई, अबरार शेख, मुज़म्मिल शेख, शेख मोहसिन भाई, मो. बिस्मिल्ला, अवेज़ शेख उपस्थित होते.







