शिवसेनेकडून भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी

0
399

 

हिंगणघाट दि.२८ ऑगस्ट
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे भाजयुमोचेवतीने आज शहरातील जयस्तम्भ चौकात दहन करण्यात आल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी याचा निषेध करीत भारतीय जनता पार्टीच्या सहभागी कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली.
आज दि.२८ रोजी शहरातील जयस्तंभ चौकात सकाळी ११ वाजताचे दरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले,यानंतर संतप्त झालेल्या शिवसेना तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यानी ठाणेदार संपत चव्हाण यांना निवेदन देत सहभागी कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली.
यावेळी शिवसेनेचे सतीश धोबे,अभिनंदन मुणोत,प्रकाश अनासाने,मनीष देवढे,दशरथ ठाकरे,अनिल भोंगाड़े,सुरेश मुंजेवार,मनोज वरघणे,भास्कर ठवरे,नंदू रेडलावार,श्रीधर कोटकर,महेश खडसे,निखिल वाघ,मुन्ना त्रिवेदी,आकाश निखाड़े,आकाश निखाड़े,मुन्ना काशीनिवास,आशिष भांडे इत्यादि हजर होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here