साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक व पत्रकारांना केले सन्मानित

0
769

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल येथील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त समाजाचे मार्गदर्शक शिक्षकांचा व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार यांचा आज रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतूल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अतूल पाटील म्हणाले की, शिक्षणातुन संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होते, आपले हक्क मिळवण्याची शक्ती मिळते, लोकशाहीत शिक्षणातुन आपले मत मांडण्याची ताकत आपल्याला मिळते. यातुनच एक चांगला व्यक्ति निर्माण होतो. यामुळेच शिक्षकांबदल आपल्याला आदर आहे. आपल्या देशात न्यायालय आणि न्यायाधिश यांना सर्वोच्च मानले जाते. आपण त्यांच्यासमोर झुकतो. परंतू विदेशात जर न्यायालयात शिक्षक आले तर न्यायाधिश हे उभे राहून त्यांचा सन्मानासाठी आदराने झुकतात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाबद्दलची आदराची भावना निर्माण करणे हे पालकांची जबाबदारी असल्याचे मनोगत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केलीत.

साने गुरूजी विद्यालयाच्या आवारात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते , शालेय समितीच्या सभापती रेखा चौधरी, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक अभीमन्यु चौधरी, नगरसेवक समिर शेख मोमीन, सामाजीक कार्यकर्ते दिलीप वाणी, गणेश महाजन, हाजी फारूक शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक एम. के. पाटील यांनी केले तर कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन डी. एस. फेगडे यांनी केले तर आभार एम एस चौधरी यांनी मांडले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here