उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे हत्तीरोग विकृती व्यवस्थापन किट चे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते वाटप.

0
269

 

राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग विकृती व्यवस्थपन किट च्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक ०८/०९/२०२१ ला पार पडला. सदर कार्यक्रमाला हिंगणघाट विधानसभेचे आमदार मा. समीर कुणावार तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चाचरकर आणि वर्धा जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी मा.सौ. जयश्री थोटे मॅडम उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा हत्तीरोग पर्यवेक्षक श्री दिलीप बरबट ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. चिंचोळकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण वासाडे हे उपस्थित होते.
हत्तीरोग झाल्यानंतर रूग्णांना पायाशी संबंधित विविध त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासापासून सरंक्षण करण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजने संबधीत विस्तृत मार्गदर्शन हत्तीरोग रुग्णांना सौ थोटे मॅडम यांनी केले. भविष्यात हत्तीरोग रुग्णांची संख्या कमी करून हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यासाठी समाज सहभागाचे महत्व मा.आमदार समिर कुणावार यांनी अधोरेखित केले. कीटकजन्य रोगापासून स्वतःचा आणी स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची सविस्तर माहिती आपल्या भाषणातून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चाचरकर सर यांनी दिली. या कार्यक्रमाला हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील संपुर्ण ग्रामीण भागातील हत्तीरोग रुग्ण उपस्थित होते. दोन्ही तालुक्यातील एकूण 135 हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग व्यवस्थापण किट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हत्तीरोग उपपथकाचे प्रभारी आरोग्य सहाय्यक श्री उमेश मेश्राम, यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री लिडबे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सचिन खंदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल कुमरे,,सुभाष वाडगे राम मेश्राम, रोशन सावळीकर,मनोज वरभे, प्रशांत बारडे,कमल शेंडे सिध्दार्थ बहादे इ.नी सहकार्य केले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here