आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले
महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री बंदी असूनही वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात गुटखा विक्री सर्रास पान टपरी व दुकानांत होतांना दिसतं आहे मात्र या गुटखा व पान मसाला विक्रीमुळे युवा पिढी नशेचा आधीन होत आहे, आणि कर्करोगाच्या बिमारीला बळी पडावे लागेल अशी चर्चा आर्वीतील जनतेमध्ये होतांना दिसून येत आहे. पान टपरी व दुकांनादारांमध्ये गुटखा विक्री चे एवढे बळ येते तरी कुठून या गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद तर नाही ना ? अशी चर्चा आर्वी तालुक्यातील जण सामान्यतः होत आहे. तरीही आर्वी तालुक्यात गुटखा विक्री वर संबधित प्रशासन बंदी आणणार की नाही ? या कडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

