येथील महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावरील खड्यांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

0
535

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

नेहमी वर्दळीचा असेलला महामार्ग खड्डेमय झाला आहे. या खाड्यांमध्ये पाणी साचत असून यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने एखाद्याचा यात नाहक बळी जात असेल तर या खड्यांचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यात महामार्गावरील खड्ड्यांची पूजा करून त्याचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी तात्काळ हे खड्डे बुजविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष शाम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना गौरव कोळी, विभागाध्यक्ष आबिद कच्छी, विपुल येवले, प्रतिक येवले, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी, आकाश चोपडे, कमलेश शिर्के आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here