Home Breaking News अखिल भारतीय छावा संघटनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

अखिल भारतीय छावा संघटनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

मसलगा: अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्या वतीने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना आज मसलगा येथे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी करताना निवेदन देण्यात आले. मसलगा मध्यम प्रकल्प व मांजरा नदीमुळे मसलगा सोळ नदीकाठची शेतजमीन कायम बाधीत होते. त्यामुळे कायम बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करा व सर्व अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्थ शेतकर्‍यांना सरसकट 50 हजाराची मदत करावी असे निवेदन दिले.
यावेळी गुरुनाथ जाधव, बाबासाहेब पाटील, सतीष जाधव, ज्ञानेश्वर पिंड, प्रकाश जाधव, दिलीप जाधव, बालाजी पिंड, सुनिल पाटील, दिपक पिंड, दगडू आरेराव, हारीदास साळुंके, प्रल्हाद लोकरे आदी शेतकरी उपस्थित होते.