ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर
वैजापूर: वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नाशिक औरंगाबाद महामार्गावर पालेजा पेट्रोल पंपाजवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे जण ठार झाले.मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक बस क्र(एम एच १४ बी टी ३३४४) औरंगाबादवरून वैजापूरकडे जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीशी (एम एच २० एफ एन ४१७२)धडक झाली . अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले.अमोल भाऊसाहेब ठुबे(वय २३ रा.पोखरी ता.वैजापूर),सोमनाथ साहेबराव निकम (वय ३२रा.शिऊर ता.वैजापूर),कडूबा ज्ञानेश्वर ठुबे(वय२२ रा.पोखरी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत दुचाकीला धडक दिल्यानंतर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर बस रस्त्याच्या खाली उलटली.चालकासह काही प्रवाशांना किरकोळ मार लागला सुदैवाने सर्व ४३प्रवाशी सुखरूप बाहेर काढले गेले.या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.जखमी बसचालक विकास सुर्यवंशी यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .