Home Breaking News नांदगावी चोरट्यानी किराणा दुकान फोडुन सुकामेव्याची केली चोरी

नांदगावी चोरट्यानी किराणा दुकान फोडुन सुकामेव्याची केली चोरी

0
243

 

निलेश पगारे नांदगांव तालुका : (प्रतिनिधी)

शहरातील प्रभाग एक मधील शांतीबाग या सदन वस्तीत एका रात्री तीन ठिकाणी बंद घराच्या चोऱ्या झाल्या असून किराणा दुकान फोडुन दुकानातील सुकामेवा काजु,बदाम,गावरान तूप आदी सह रोख रक्कम व चोरट्यांनी तीन दुचाकी देखील
लंपास केल्या आहे .या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .घटनास्थळी नांदगांव पोलिसांनी पहाणी करुन पंचनामा केला.
दि ५ रोजी मध्यरात्री शहरातील शांतीबाग या वस्तीमध्ये भारत गॅस गोडाउन जवळील नावंदर किरणां दुकानाचे शटर उचकुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन आतील काऊंटर मधून २० हजार रुपयांची चिल्लर
,काजु ५० किलो, (अंदाजे किं. ४० ह.रु)
बदाम ३०कि लो(अंदाजे किं. ३२ ह .रु)
गावरान तूप २० किलो( अंदाजे किं.१२ ह. रु )आदी १ लाख २ हजार रूपयांचा एैवज चोरी करुन
भामट्यांनी तेथून बाजूच्या गल्लीत जाऊन कंपाउडच्या भिंती चढून
गोविंद मोगल यांच्या घराच्या मागील बाजूने लोखंडी जाळी काढून आत घुसुन घरातील कपाटातील २५०० रु रोकड,दिड तोळे सोने दागिने( 45 ह रु किंमतीचे) एकुन ४७५०० रुपयांचा माल लंपास केला तेथून बाहेर निघून चोरटे शेजारी एस. पी. पाटील यांच्या घराची झाडा झडती घेतली पण तेथून ते रिकाम्या हाताने परतले नंतर जवळील कचेश्वर मुंडे,व दिगंबर मुंडे (रा. खिर्डीसाठे ) यांच्या मालकीच्या घरासमोरील दोन प्लेटीना नं
(Mh41/AY 6662),
(Mh 15/GN 8165 ) आदी तीन दुचाकी घेऊन पसार झाले.
शहरातील शांतीबाग येथील घरांची व दुकानाच्या चोरीच्या घटना स्थळी पोलीस उप अधिक्षक समिरसिंग साळवे, पो नि. अनिल कातकाडे
सा. पो. नि दिपक सुराडकर ,पोलीस कर्मचारी, आणि नाशीकचे डाॅग स्काॅड ने माग काढले, आणि फिंगर प्रिंट चे ठसे देखील घेण्यात आले .

प्रतिक्रिया :नागरिकांना कोणी संशयीत आढळल्यास पोलिसांना कळवा तसेच राञीच्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहुन तसे काही अाढळुन आल्यास अलर्ट रहा नांदगांव चोरीच्या घटनेचे आरोपी लवकरच जेरबंद होतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here