Home Breaking News यावल नगर परिषदच्या नव्याने उभारण्यात आलेल्या साठवण तलाव भ्रष्टाचाराची संपुर्ण चौकशी होत...

यावल नगर परिषदच्या नव्याने उभारण्यात आलेल्या साठवण तलाव भ्रष्टाचाराची संपुर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत बांधकाम करू नये : भाजपाची मागणी

0
399

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या नविन साठवण तलावात लाखो रुपयांचा गैरव्यहार व भ्रष्ठाचार करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचे कडे दिनांक ३o/९/२०२१ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तक्रार करण्यात आली असुन त्याची संपूर्ण चौकशी होत नाही तो पर्यंत जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतीही दुरुस्ती कामे व नवे काम करू नये बाबतची लिखित निवेदन आज यावल मुख्यधिकारी यांच्याकडे भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे .
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या माहीतीनुसार दिनांक ३०/०९/२०२१ रोजी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत, यांच्यासह ना .एकनाथ शिंदे , ( नगरविकास मंत्री ) महाराष्ट्र राज्य, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,
राज्याच्या विधान परिषदचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य प्रवीण दरेकर व महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री . तथा जिल्ह्यचे पालकमंत्री, ना.गुलाबराव पाटील, माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीश महाजन , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार सुरेश भोळे (राजू
मामा) यांचे कडे पक्षाच्या माध्यमातुन यावल नगर परिषदच्या साठवण तलावाच्या उभारणीत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे .तरी सदर भ्रष्टाचार बाबत केलेल्या
तक्रारीचा वरिष्ठ पातळीवरती चौकशी होऊन योग्य ते निर्णय लागत नाही तो पर्यंत जुना साठवण तलाव व नवीन
साठवण तलावाचे कोणतेही प्रकारे डागडुगी दुरुस्ती किंवा नवीन प्रकारचे कोणतेही बांधकाम अथवा भराव करण्यात येऊ नये तसे झाल्यास यास नगर परिषदचे प्रशासन म्हणून आपण स्वतः मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी हे सर्वस्व जबाबदार
राहतील असे दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात म्हटले असुन , यावेळी नगर परिषदेला देण्यात आलेल्या निवेदना प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , नगरसेवक तथा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉ . कुंदन फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे व अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here