संबंधितांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी! दिव्यांग व्यक्तीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

0
564

 

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद (काटेल) येथील दिव्यांग तरुणावर व त्याच्या परिवारावर हल्ला करून गावातून हाकलून देऊ! अशा लोकशाही विघातक कृत्याच्या निषेधार्थ तालुक्यातील मंडळींनी काल दि. 25 ऑक्टोबर ला मा.तहसीलदार संग्रामपूर ह्यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी बुलढाणा ह्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असे आहे की, दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. ह्या आशयाचे निवेदन देऊन येत्या 8 दिवसात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणास बसू असा आक्रमक इशारा कोलद येथील दिव्यांग तरुणाने दिला आहे.सदर निवेदन हे मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक बुलडाणा व मलकापूर, मा.उपविभागीय आयुक्त अमरावती ह्यांना प्रतिलिपीत देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here