Home Breaking News स्टेट बँकेवर दरोडा, तिजोरी फोडून 20 लाख पळविले, पोलीस तपास सुरू..

स्टेट बँकेवर दरोडा, तिजोरी फोडून 20 लाख पळविले, पोलीस तपास सुरू..

0
440

 

केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज सकाळी समोर आली असून दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून 20 लाखांची रोकड लंपास केलीये… बँकेचा शिपाई ने बँक उघडल्याव हा प्रकार समोर आला आणि पोलिसांना याची तात्काळ माहिती दिलीय.. यामुळें मात्र बुलडाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय..
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेवर मध्यरात्रीतून दरोडा पडल्याची घटना घडली असून सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची माहिती समोर आलीय… जवळपास २० लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले असून, श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेन्हात येत आहे… बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून दरोडेखोर बँकेत शिरले आणि बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली.. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्‍हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला आणि त्‍याने बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले… अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आलीय.. तर श्वानाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग जाऊन तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज आणि बॅटरी मिळून आली असून सीसीटीव्‍हीत दोन दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता आहे .. तर या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here