हिंगणघाट दि.०३जनतेची सेवा करतांना मी नगरपालिकेसह कुठेही भ्रष्टाचार खपवून घेणार नसुन आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही,अशी ग्वाही देतांना आमदार समिर कुणावार यांनी विकासाचे राजकारण करीत असल्याचे यशवंतनगर येथील विरांगना झाशी राणी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सांगितले.
यावेळी त्यांनी नुकताच पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांचाही चांगलाच समाचार घेतला.
शहरात विकास कामे व सौंदर्यीकरणांतर्गत दि.०२ नोव्हेंबर रोजी झाशी राणी चौक येथे विरांगना झाशी राणी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
स्थानिक प्रभाग क्रमांक १४ यशवंतनगर येथील पुतळ्याचे अनावरण आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,बांधकाम सभापती सौ.छाया सातपुते,रिपाईचे शंकर मुंजेवार,रोटरीचे अध्यक्ष प्रा. जितेंद्र केदार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचेवेळी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी,जिल्हा महामंत्री किशोर दिघे,श्याम भिमनवार,अंकुश ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले.
स्थानिक यशवंतनगर प्रभागातील नागरिकांची झाशी चौक येथे विरांगना झाशी राणी पुतळ्याची अनेक वर्षापासून मागणी होती, आमदार कुणावार यांचे प्रयत्नाने आज ही मागणी पूर्ण झाल्यामुळे या प्रभागातील नागरिक तसेच संस्था,संघटनांनी आ.कुणावार तसेच पालिका प्रशासनाचे आभार मानले.
याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सौ.शारदा पटेल,न.प.बांधकाम सभापती छाया सातपुते,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. प्रशांत धमाने,सामाजिक कार्यकर्ता पंकज देशपांडे, प्रा.सोमेश्वर कोरडे इत्यादि मान्यवर हजर होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर दिघे तर संचालन प्रा.किरण वैद्य यांनी केले, नगरसेविका सौ.छाया सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली पालांडे,सोनल चावडा, पुष्पा ठाकूर,मंगला तराळे,श्रीमती तिवारी, श्रीमती होटे,वंदना कांबळे नगरसेविका रवीला आखाडे, सुनिता माळवे,शुभांगी डोंगरे,वैशाली सुरकार यांनी परिश्रम घेतले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा