Home Breaking News वेकोली प्रदूषण विरोधात 2 तास काँग्रेसचा रस्ता रोको

वेकोली प्रदूषण विरोधात 2 तास काँग्रेसचा रस्ता रोको

0
341

 

वेकोलीला लाखो रुपयांचा फटका काँग्रेस – भाजप आमने सामने

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : वेकोलीच्या सि.एच.पी जुना बंकर व न्यू सायडिंगच्या प्रदूषणा विरोधात परिसरातील नागरिकांना घेवून घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत कारगिल चौक रेल्वे गेट समोर सुमारे दोन तास बैठा आंदोलन करण्यात आला.
वेकोली मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या वाहतूक रोखून धरण्यात आली.
यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच लागल्या यामुळे वेकोलीला लाखो रुपयांचा फटका बसला आहेत.
दुपारी एक वाजता वेकोली सब एरिया मॅनेजर फुलारे यांनी ठाणेदार बबनराव पुसाटे, काँग्रेस पदाधिकारी,व नागरिका समक्ष आठ दिवसांत प्रदूषण नियंत्रण करण्याचे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
काँग्रेसने आंदोलनाचे रीतसर निवेदन देऊन
प्रसार माध्यमातून पोर्टल व बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.
मात्र भाजप नेत्यांनी कुठल्याही प्रकारे सूचना न देता सकाळीच
प्रदूषण विरोधात आंदोलन शुरू केल्याने काँग्रेस व भाजप आमने – सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकाच मागणीला घेवून रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते बसल्याचे आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले आहे.
काँग्रेसच्या वतीने युवा नेते सुरज कन्नूर, इर्शाद शेख, इदरीस भाई,आफताब अली सदर,सैदू भाई,मोसीम शेख,रोशन दंतलवार,देव भंडारी,अनुप भंडारी,रफिक शेख, रोहित डाकूर,अय्यूब कुरेशी,कपिल गोगला,संजय कोवे, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here