काँग्रेसचे ठाणेदारांना निवेदन
(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजुरेडडी यांनी आपल्या सामाजिक कार्याने जनमाणसात स्वच्छ प्रतिमा निर्माण करून काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात यश मिळविले आहे.
मात्र त्यांच्या वाढती लोकप्रियता विरोधकांना सहन होत नसल्याने
फेसबुकवर ‘घुग्घुस का सत्या” या फेक आय.डी.च्या माध्यमातून बदनामीकारक बातम्या पेरल्या जात आहेत.
हनुमान जंयतीच्या दिनी 16 फेब्रुवारीला रेड्डी यांना सकाळी 07 वाजता पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील डॉ. शिरीष चौधरी यांच्या रुग्णालयात भरती केले असता शहर अध्यक्षाने पत्नी सोबत झालेल्या भांडणात विष पिवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा खोटा व बदनामी कारक पोस्ट प्रसारित केली यानंतर पत्नीने अध्यक्षाला व प्रेयसीला चपलेने मारहाण केल्याची खोट्या चरित्र हनन करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या या सोबतच गब्बर जाग जायेगा या फेक आय. डी. च्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी संविधान विरोधात चुकीची पोस्ट करून शहरातील शांती भंग करण्याचे प्रयत्न केला होता व नंतर पोस्ट डीलेट केली.
या फेक अकाउंट्वरून ही जाती धर्मात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकून गावातील शांती व सुव्यवस्था बाधीत करण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे.
शहरात अश्या प्रकारच्या ज्या काही फेक आय. डी. ची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाईच्या मागणी करिता आज काँग्रेस अध्यक्ष राजुरेडडी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन येथे ठाणेदार श्री.बबनराव पुसाटे यांना निवेदाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती
मागणीची तातडीने दखल घेत पोलीस उप – निरीक्षक मेघा गोखरे यांच्या तर्फे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले
सायबर सेलच्या माध्यमातून फेक अकाउंट वरून बदनामी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,अलीम शेख,मोसिम शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी,भैय्या भाई,दीपक पेंदोर,देव भंडारी,विजय माटला, रोहित डाकुर, साहिल सैय्यद,अय्युब कुरेशी,प्रणय कनकुटला,रफिक शेख
बालकिशन कूळसंगे,कुमार रुद्रारप, कपिल गोगला,राकेश डाकुर, खादिम शेख, रंजीत राखुंडे,संजय कोवे,दानिश शेख,
व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते








