हिंगणघाट नगरपालिकेत प्रशासनाचा भ्रष्टाचार उघड !

0
1085

 

हिंगणघाट नगरपालिके कडून दिनांक 14 मार्चला शासकीय रोड वरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात दुकानदारांना नोटीस देण्यात आली यावर कारवाई न करता फक्त बस स्टँड समोरील चर्चला लागून असलेल्या दुकानदारा वरच का कारवाई करण्यात आली ?
सविस्तर माहिती अशी की 14 मार्चला हिंगणघाट नगरपालिकेने रोड वरील दुकानदारांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिली. त्यानंतर कारवाई केली नाही ? त्यामुळे अतिक्रमण विभाग प्रमुख घोडमारे यांना यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे. याकरता पोलीस विभागात आम्ही पैसे भरले आहे . पोलीस विभागाने इतर कारणामुळे सध्या बंदोबस्त देऊ शकत नाही त्यामुळे ही कारवाई थांबलेली आहे असे उत्तर दिले. त्यानंतर 9 मे ला अति — जलद हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने बस स्टॅन्ड , चर्चला लागून असलेले अतिक्रमण , नूतन शाळे समोरील अतिक्रमण बद्दल दुकानदारांना नोटीस दिली . व 13 मे ला फक्त चर्च समोरील दुकानदारावर कारवाई करण्यात आली ? यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होतात ? याला हिंगणघाट शहरातील शासन व प्रशासन दोन्ही जबाबदार आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here