मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेचा धक्का : 40 लाख महिलांना या कारणांमुळे लाभ मिळणार नाही(Ladki Bahin Yojana )

0
10
अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

Ladki Bahin Yojana :महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. मात्र,

अलिकडच्या पडताळणी प्रक्रियेमुळे या योजनेतून 40 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही पडताळणी राज्य सरकारच्या नव्या निकषांनुसार केली जात आहे, ज्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

कोणत्या निकषांमुळे अपात्र ठरणार?

संजय गांधी निराधार योजना: या योजनेचा लाभ घेणाऱ्या 2 लाख 30 हजार महिला अपात्र ठरणार आहेत.

वयाची मर्यादा: 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या 1 लाख 10 हजार महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

चारचाकी वाहन: कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या 1 लाख 60 हजार आहे.

नमोशक्ती योजना: या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येईल.

स्वेच्छेने नाव मागे घेणे: काही महिला स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नवीन निकष आणि प्रक्रिया या योजनेसाठी आता दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ‘ई-केवायसी’ आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana:यामुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवरील भार कमी होण्याची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा सर्वाधिक फायदा घेतला आहे, तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here