विलास सावळे मूर्तिजापूर /अकोला
MurtijapurNews:मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी योगेश प्रकाश हरणे यांनी २७ तारखेला विष प्राशन करून आपले जीवन संपवले.
काही महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते.
त्यांच्या या आत्महत्या च्या घटनेने १० व १२ वर्षाचे असणारे मुलगा आणि मुलगी अनाथ झालेत. त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरता शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे, जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर व अरुण बोंडे यांनी आर्थिक मदतीसाठी आज सकाळी व्हाट्सअप द्वारे जनतेला आवाहन केले होते.
त्यांच्या आव्हानाला जनतेतील जागरूक शेतकरी, किसान पुत्र असणारे डॉक्टर्स,अधिकारी , सामाजिक कार्यकर्ते, यांनी या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन दोन तासात ५१ हजार रुपया पर्यंतची रक्कम जमा झाली.
मृतकाचे रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. कमी पिक, हमी भावापेक्षा मिळालेला कमी बाजार भाव,या मुळे पिकातून कर्जाची परतफेड न झाल्यामुळे त्यांनी आज हे टोकाचे पाऊल उचलले.
आज दुपारी बारा वाजता रसुलपुर, येथे हरणे कुटुंबाच्या निवासस्थानी शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जावून सांत्वन केले. रोख जमा झालेला ३५ हजाराचा निधी मुलांच्या स्वाधीन केला.
MurtijapurNews:या वेळी लोकनायक,शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे, राजूभाऊ वानखडे,प्रा.सुधाकर गौरखेडे,कैलास साबळे ,विजय लोडम ,मुन्ना नाईकनवरे,नंदकिशोर बबानिया,अवि पोळकट,सुरेश जोगळे, अरविंद तायडे,अनिल डायलकर,संतोष रूद्रकर,अरुण बोंडे उपस्थित होते.