AkolaNews/ ‘मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका’, व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठीने संपवले जीवन

0
2013

 

AkolaNews:अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा येथे एक धक्कादायक घटना घडली. तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी आपल्या जीवनाचा दुवा संपवल

या घटनेत धक्कादायक गोष्ट म्हणजे, शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्येचा निर्णय व्हॉट्सअपवर एक यादीच्या रूपाने घोषित केला आणि त्यांच्या पत्नीला आपला चेहरा दाखवू नका असं विनंती केली.

Beed Blast/ मशिदीत स्फोट होण्यापूर्वी आरोपीचा धाडसीपणा समोर आला.

शिलानंद तेलगोटे हे तेल्हारा तहसील कार्यालयात पटवारी म्हणून कार्यरत होते. व्हॉट्सअपवरील त्यांच्या शेवटच्या स्टेटसमध्ये पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे.

त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे की, पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते, त्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते पण भावा हफ्ते फेडण्यास नकार दिल्यामुळे त्यांना व्यासासह पैसे द्यावे लागत होते.

यातच पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळाचाही सामना करावा लागत होता. पत्नी त्यांना अश्लील शिवीगाळ देत असे, म्हणून त्याला गेल्या ५ दिवसांपासून जेवण करणे शक्य नव्हते.

मृत्यूनंतर आपला चेहरा कोणालाही दिसू शकतो पण पत्नीला नको, असं त्यांनी नमूद केलं आहे. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.

शिलानंद तेलगोटे हे अकोट येथील रहिवाशी असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

फेरफार प्रणालीतील उत्कृष्ट कार्यासाठी काही वर्षांपूर्वी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी त्यांचा सत्कार केला होता.

AkolaNews :चार वर्षांपूर्वी शिलानंद यांनी फेसबुकवर पत्नीसाठी कविता टाकली होती. आत्महत्येच्या निर्णयाने समाजात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here