jayshree tai shelke:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या दोन प्रतिष्ठित सुनांचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील करवंड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
या गावात जिजाऊ माँसाहेबांच्या सहाव्या सुनबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले
तसेच तंजावरचे राजे छत्रपती व्यंकोजी राजे यांच्या पत्नी राणी दीपाताई राजे यांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
करवंड गावाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे कारण इथले इंगळे परिवार हे स्वराज्यासाठी समर्पित होते. या गावात पूर्वी ५२ बुरूज होते,
पण सध्या केवळ ३-४ बुरूज उरले आहेत, ज्यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेच्या ॲड. शेळके यांच्या मते, या गावाचा इतिहास उजळवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या गौरवात भर घालण्यासाठी या दोन्ही कर्तृत्ववान सुनांचे स्मारक उभारणे आवश्यक आहे.
बावनबुरुजी परिसरात या गावाचे नाव आजही महत्त्वपूर्ण आहे, मात्र प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या या गावाचा ऐतिहासिक कधी लक्षात येत नाही.
jayshree tai shelke:त्यामुळे शासनाने या स्मारकांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.