[निषाद पार्टीचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले निवेदन.]
संग्रामपूर (प्रतिनिधी)ः- अकोला शहरातील एका भागात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन दि.९./९/ २०२५ रोजी निषाद पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दि.6/9/2025 रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान अकोला शहरातील गुलजार पुरा भागात राहणाऱ्या भोई समाजाच्या गरीब कुटुंबातील ते १३ वर्षीय मुलीवर तोहित समीर नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने मुलीच्या घरचे लोक गणेश विसर्जना करता गेल्याचे पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
असून सदर आरोपी हा फरार पासून तो गुलजारपुरा भागातील राहणार आहे, करीता त्याला लवकरात लवकर अटक करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. सदर आरोपीला दोन दिवसात अटक करण्यात यावी. अन्यथा निषाद पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
Raipnews/सदर निवेदनावर निषाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवानंद आमझरे ,जिल्हा कार्याध्यक्ष विजय आमझरे ,प्रदेश युवा अध्यक्ष दिलीप घट्टे ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शारदा भारसाकळे, युवा वाहिनी विदर्भ अध्यक्ष रमेश नांदणे यांच्या सह्या आहेत.








