Farmernews /दारोडा येथे आत्मा अंतर्गत ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम: सघन कापूस लागवड व रब्बी हंगामाचे नियोजन

0
26

 

प्रतिनिधी सचिन वाघे

दारोडा – ४ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी साईबाबा सभागृह, दारोडा येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आत्माचे ए. एन. देवतळे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, हिंगणघाट यांनी प्रास्ताविक देऊन केली.

कृषि शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे यांनी शेतकरी दिलीप पोहणे यांच्या शेतातील सघन कापूस लागवडीचा शिवार फेर करून प्रत्यक्ष फायद्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. रुपेश झाडोदे यांनी रब्बी हंगामातील एकात्मिक पिक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले.

डॉ. निलेश वझिरे यांनी कपाशी पिकातील किड व रोग नियंत्रणाबाबत, तर डॉ. सविता पवार यांनी BBF लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
मा. श्रीकांत अमरशेटीवार, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ यांनी जमीन तयार करण्यापासून लागवड खर्च व विक्री व्यवस्थापनापर्यंतचा मार्गदर्शन दिले.

तसेच, मा. स्वप्नील तोरणे, उपविभागीय कृषी अधिकारी, हिंगणघाट आणि एस. डी. सुतार, तालुका कृषी अधिकारी यांनी योजना अंमलबजावणी आणि विविध कृषी योजनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी दिलीप पोहणे यांनी सघन कापूस लागवड अनुभवावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभाप्रदर्शन डॉ. अंकिता अगायित्कर यांनी केले.

Farmernews /दारोडा, वडनेर, कूटकी, आर्वी, काचगाव, सिरगाव आणि इतर गावांतील शेतकरी बांधव आणि महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here