यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे
यावल नगरपरिषद निवडणुकीत एकूण नगरसेवक सेविका साठी १३१ अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्षा पदासाठी ६ अर्ज प्राप्त झाले आहेत
असे एकूण १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज म्हणून १आलेला होता दिनांक १४नोव्हेंबर रोजी ६ अर्ज दाखल,दिनांक १५ नोव्हेंबर रोजी २३अर्ज दाखल दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ५४अर्ज दाखल दिनांक १७ नोव्हेंबर रोजी म्हणजे शेवटच्या दिवशी ५३उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
भाजपा चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रोहीणी फेगडे यांचा उमेदवारी अर्ज. रॅली द्वारे शक्तिप्रदर्शन
यावल : नगरपालिका निवडणूक २०२५ च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
असून भाजपाचे वतीने रोहिणी फेगडे यांनी , तर शिवसेना शिंदे गटाचे वतीने ऍड स्वाती मनोहर पाटील यांचे नगराध्यक्ष पदासाठी तर २३ नगरसेवक निवडीसाठी ४८ नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत.त्यामुळे आज पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
येथील फैजपूर रस्त्यावरील श्री मनुदेवी मंदिरापासून भाजपाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले आहे आमदार अमोल जावळे त्यांनी मार्गदर्शन केल्या त्यानंतर मुख्य रॅलीस प्रारंभ झाला सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिकेसमोर यात्रेचे स्वरूप आले होते.
Nivdnuknews/निर्णय अधिकारी पण मोहनमाला नाझीरकर व सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता यावल मध्ये युती झालेली नसुन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महाविकास आधाडीला पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. तर मंगळवारी छाणणी आहे.








