[नामांकित व बहुचर्चित असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेचा प्रताप]
[न्यायालयाने नुकसान भरपाईचे आदेश देऊनही प्रशासनाकडून बँकेच्या पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न ] स्थानिक व्यापाऱ्याचा आरोप!
[कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवूनही पोलीस प्रशासनाची चुप्पी.]
बुलडाणा/वाशिम -वाशीम जिल्ह्यातील मानोरा शहरासह राज्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेच्या शाखा व धान्य गोदामे वेअरहाऊस असलेल्या बुलढाणा अर्बन बँक (शाखा मानोरा) मधील तारण ठेवलेल्या शेकडो क्विंटल सोयाबीन व तूरीचे धान्य अफरातफर केल्याप्रकरणी तक्रारदार फसवणूक झालेले व्यापारी तथा शेतकरी गणेश राठोड यांच्या तक्रारीकडे प्रशासनाकडून हेतूपुरस्पर दुर्लक्ष केल्या जात असल्याने संबंधित व्यापाऱ्याला या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केली होती.buldhanaurban
त्यांचे देणे देण्याबाबत मोठा आर्थिक दबाव निर्माण झाल्याची आपबीती हवालदिल झालेल्या व्यापाऱ्या बाबत निर्माण झालेली आहे.manoranews
ह्याबाबत प्राप्त माहिती अशी की
कोट्यावधीची गुंतवणूक असणाऱ्या व नामांकित परंतु बहुचर्चित अनेक गैरप्रकाराने गाजलेल्या बुलढाणा अर्बन च्या इथली रस्त्यावरील धान्य गोदामात शेकडो किंटल सोयाबीन व तूर ठेवलेल्या बुलडाणा तक्रारदार व्यापाराच्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाकडून नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.
परंतु व्यापारी व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तूर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा अर्बनच्या सर्वेसर्वा असणारे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि सुकेश झंवर (अर्बन वेअर हाऊस) यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी सहाय्यक निबंधक व आयुक्त यांच्याकडे बुलढाणा अर्बनच्या गोदामामध्ये धान्य ठेवलेल्या मानोरा येथील व्यापाऱ्याने तक्रार केली होती.
Buldhanaurbannews /परंतु शासकीय कार्यालयाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना बाजार भावा प्रमाणे ९५० पोते तूर व ४६ किंटल सोयाबीन ची रक्कम गणेश लक्ष्मण राठोड ह्यांना द्यावी. असे आदेश देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचा दावा व्यापारी राठोड यांनी केला आहे.kiritsomya
नुकसानग्रस्त व्यापारी गणेश लक्ष्मण राठोड यांना प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने शेवटी कोर्टात धाव घेतली असता कोर्टाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु त्या आदेशाचे पालन पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याची व्यथा व्यापारी गणेश राठोड यांनी बोलून दाखविली. माझ्याकडे होती.
Manoranews/ती जमा पुंजी मी सोयाबीन व तूर साठवणूक करून ठेवलेली होती, बुलढाणा अर्बन मध्ये साठवून ठेवलेली व ते धान्य मला न मिळाल्याने आता माझ्याकडे आर्थिक तंगी असून अनेक शेतकऱ्यांचे माझ्याकडे देणे बाकी आहे. तेव्हा मला न्याय मिळावा व शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे डुबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी व्यापारी गणेश लक्ष्मण राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.manoranews








