Cricket news/क्रिकेटचा जल्लोष सुरू!वाघझिरा येथे आदिवासी प्रीमियर लीग 2026 ची ग्रँड ओपनिंग

0
1

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुक्यातील वाघझिरा येथे “राज बांधू सप्लायर्स” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग 2026 (सीजन 2) स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दिनांक 2 मे 2026 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले असून परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.jalgaon

या स्पर्धेत स्थानिक तसेच परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला असून खेळाडूंमध्ये जिंकण्याची चुरस दिसून येत आहे. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होत असून प्रेक्षकांचा उत्साहही तितकाच वाढलेला दिसत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धा होत असल्याने नवोदित खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे—प्रथम पारितोषिक: ₹21,000 व चषक
द्वितीय पारितोषिक: ₹11,000 व चषक
तृतीय पारितोषिक: ₹5,000 व चषक उद्घाटन सोहळ्यावेळी गावातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, बालसिंग बारेला (उपसभापती), मालेद ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रमाबाई बारेला, सामाजिक कार्यकर्ते सचिन तडवी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडेमुळे एकता व शिस्त वाढते, असे मत व्यक्त केले. Yavalnews

कार्यक्रमस्थळी रंगीत मंडप, आकर्षक बॅनर आणि चकाकणाऱ्या ट्रॉफींची मांडणी यामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय व उत्साही झाले होते. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रणजीतभाऊ बारेला यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा आणि गावपातळीवर क्रीडा संस्कृती रुजावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.cricket

Yavalnews स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक सुविधा, पाणी, बसण्याची व्यवस्था तसेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमुळे वाघझिरा परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here