नव्यानेच रुजु झालेल्या तहसीलदार कु.कोरे यांचा दणका, अवैध रेती माती वाहतूक करणाऱ्या मध्ये भरली धडकी.

1
1199

 

 

अनिलसिंग चव्हाण

मुख्य संपादक

– तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रित्या रेती ,माती वाहतुक चालू होती,.

याकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष होते .त्यात निवडणुका असल्यने तर खुलेआम अवैध रेती ,मातीची वाहतुक सुरु होती.परंतु नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार कु.कोरे यांनी आल्या आल्या आल्याच दखल घेवुन अवैध रित्या मातीने भरलेले ट्रॕक्टर पकडले.

 

ब्रेकिंग बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8204

 

त्यामुळे अवैध रेती ,माती वाहतूक करणाऱ्यांमध्ये धडकी भरली.
वरवट बकाल येथे गेल्या एक महिन्या पासुन अवैध रेती व मातीची वाहतूक चालू होती तरी महसूल विभाग पथक कुंभकर्णी झोपेत होते ,

अखेर आज दि.२२/जानेवारी रोजी नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार कु.तेजश्री कोरे यांना माहिती मिळाल्यावरुन त्यांनी दखल घेवून त्यांनी

ना.तहसीलदार प्रविणकुमार वराडे यांना सोबत घेवून पाहणी करण्या करीता गेले असता वानखेड शिवारातून अवैध मातीचे उत्खनन सुरु आहे.त्यावरुन रिंगणवाडी रोडवर मातीने भरलेले ट्रॕक्टर पकडले .

वृत्त लिहे पर्यंत ट्रॕक्टर मालकाचे व चालकाचे नाव समजले नाही.

कार्यवाही सुरु झाल्याने अवैध रेती माती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांमध्ये धडकी भरल्याचे समजते.आतातरी संबधीत पथकाने दखल घेणं आवश्यक असल्याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here