अनिलसिंग चव्हाण बुलढाणा
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथून जळगाव जामोद रोडवर गोरक्षनाथ नदीपात्रात एक भलेमोठे हिरवे कडूनिंबाचे झाड मशिनद्वारे कापून नेत असताना प्रवासी नागरिकांनी व पत्रकारांनी विचारणा केली असता , सदर झाड कापणारे आरोपी पळ काढला. उपस्थित नागरिकांनी व पत्रकारांनी वनविभागाशी सम्पर्क करताच
जळगाव जामोद वनविभागाची वाहन
घटनास्थळी पोचले, या ताफ्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया साहेब,वनपाल सानप, वनरक्षक खेडकर व इतर वनकर्मचारी हजर होते.
या अधिकाऱ्यांनी सखाराम वंडाळे यांच्या बांधावरील या कटलेल्या झाडाची पाहणी करून मोजमाप घेतले त्याचप्रमाणे शेतकरी अनिल वंडाळे यास घटनास्थळी बोलवून याबाबतीत जबाब नोंदवून घेतला.
सदर शेतामध्ये दोन अंदाजे 30 ते 40 वर्ष जुने हिरवे कडुनिंब कापलेल्या अवस्थेत आढळून आले.यापैकी एक झाडाचे लाकूड गायब होते ,तर दुसरे झाड कापून नेण्याच्या तयारीत होते.
सम्पूर्ण तालुक्यात बऱ्याच शेतीच्या बांधावरील कडुनिंबाची झाडे गायब होत आहेत, तर ही चोरी की अवैध विक्री हा तपास होणे गरजेचे आहे.
आधीच सातपुडा पर्वत वरील व वनविभागाची वृक्षांची प्रचंड हानी झालेली असताना शेतकऱ्यांनी बांधावर जपलेली ही कडुनिंबाची झाडे अशी वेगाने कमी झाल्यास पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे,
यावेळी उपस्थित पत्रकार व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वनाधिकारी कटारिया याना सदर टोळीचा तपास लावण्याची व योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली , कत्तल झालेल्या पैकी एक झाड ची परीघ 3.2मीटर असल्याचे वनधिकारिणी सांगितले.
याविषयी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी चर्चा केली असता अशी माहिती समोर येत आहे की, बांधावरील हिरवी झाडे खरेदी करणारी एक परप्रांतीय टोळी सक्रिय असून तालुक्यातील काही एजंट शेतकऱ्यांना काही पैसे चे अमिष दाखवून झाडांचा सौदा घडवून आणतात व त्यानंतर रातोरात मशिनद्वारे कापून वाहनाने जिल्हाबाहेर नेण्यात येते.
असे फिल्म् स्टाईलवृक्षतस्कर तयार झाल्याने जळगाव जामोद वनविभासमोर आव्हान उभे ठाकले आहे. याविषयीचे आरोपींचे व्हीडिओ व गाडीची नंबर प्लेट यांचा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने
आता या प्रकरणी वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्व तालुक्यातील वणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
बातमी लिहेपर्यंत पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई वनविभागाने केली नाही







