स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळा तहसील कार्यालयाला दणका

0
404

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

मोताळा:-प्रशासन हादरले तहसील प्रशासनाने दिले लेखी पत्र तात्काळ पंचनाम्याचे आदेश
विदर्भ कार्यध्यक्ष राणा चंदन व युवा नेते राजेश गवई यांच्या नेतृत्वाखाली मोताळा तहसील कार्यालया मध्ये ठिया आंदोलन
गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे पंचनामे होत नाहीये हे लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला व मोताळा तहसील च्या आवारात जो पर्यंत लेखी स्वरूपात तहसीलदार पंचनाम्याचे आदेश काढत नाही तो पर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा देताच तात्काळ तहसीलदार यांनी लेखी आदेश दिला.
यावेळी प्रामुख्याने विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन महेंद्र जाधव शे रफिक शे करीम राजेश गवई मारोती मेढे राजू पन्हाळकर बाबुराव सोनोने चंदू गवळी राजू गायकवाड गजानन गवळी राजू शिंदे संदीप गोरे विजय बोराडे निखिल पाटील भागवत धोरण गजानन तायडे नारायण तायडे शे नाजीम शब्बीर मिस्त्री शे सलीम शे हशम धम्मदीप वानखेडे मनोहर उमाळे वैभव शिरसाट राजू सुरडकर वासुदेव मेढे शुभम मेढे शुभम इंगळे नामदेव बोरकर गोपाल मिरगे हे सर्व उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here