शहर व ग्रामीण मध्ये 27 मार्च पासून शनिवारी रात्री 30 मार्च मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत टाळेबंदी

0
498

 

सचिन वाघे वर्धा

शहर व ग्रामीण मध्ये २७ मार्चपासून शनिवार रात्री पासून तर ३० मार्च मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आला वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २७ मार्च शनिवार रात्री पासून तर मंगळवार ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे. हिंगणघाट शहरात व तालुक्यात सुध्दा २७ मार्च शनिवार रात्री पासून तर मंगळवार ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६० तासांची टाळेबंदी लागू राहणार आहे. या ६० तासाच्या टाळेबंदी मध्ये शहरात व तालुक्यातील गावात अतिआवश्य सेवा ,दवाखाने ,दवाई दुकाने सुरु राहणार आहे.या ६० तासाच्या टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here