यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
केन्द्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधी शासनाने शेतकरी आणी कामगार यांच्या विरूद्ध काळ्या कायद्याविरोधात देशाचा अन्नदाता मागील १०० दिवसांपासुन दिल्लीच्या सिमेवर ठाम मांडुन आंदोलन करीत असुन या काळ्या कायद्यामुळे देशाचा अन्नदाताला मिळणारे हमीभाव आणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असुन, शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनविण्याचा केन्द्रशासना डाव आहे . या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काळ्या कायद्याला रद्द करावे तसेच पेट्रॉल , डिझेल व सातत्याने वाढणारे घरगुती गैस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती व वाढलेल्या महागाई च्या विरोधासह शेतकरी व कामगार विरोधातील कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुमारे ३००पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यु होवुन शहीद झाले असून, उद्या२६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आंदोलक शेतकरी बांधवांना पाठींबा देण्यासाठी संपुर्ण देशात काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांसह यावल तहसील कार्यालयासमोर कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करीत तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे .







