Breakingnews /हिंगणघाटजवळ वना नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

0
1052

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- तालुक्यातील वनी शिवारात वना नदीच्या पात्रात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. परिसरात काम करत असताना एका नागरिकाला हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्याने तात्काळ संबंधितांना माहिती दिली.

माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, एपीआय थूल यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल जगदीश चव्हाण, बावणे, सुटे व वैद्य हे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह वना नदीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ, थडग्याच्या परिसरात आढळून आला.

सदर इसमाच्या अंगावर टी-शर्ट, कोट व हाफ पॅन्ट होती. प्राथमिक पाहणीत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक चौकशी करून ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे पाठविण्यात आला आहे.

Hingnghatnews /सदर मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून पुढील सखोल तपास हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here