मुर्तीजापुर प्रतिनिधी विलास सावळे
अकोला : मूर्तिजापूर पोलिस स्टेशन हद्दीतील
Courtnews:पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बचाव व सरकार पक्षाची बाजू एकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने २७ मार्च रोजी आरोपी नराधम बापाला तब्बल २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर घटनेची हकिकत अशाप्रकारे, मूर्तिजापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिता ही तिच्या आइ व भावंडांसोबत तिच्या वडिलांशी आइचा वाद झाल्याने वेगळ्या गावी राहत होती. त्यानंतर वडीलसुध्दा तिच्या आइ व भावंडासोबत राहण्यास गेला व घटनेच्या काही दिवस आधी आरोपी वडील हा पीडिता व तिच्या बहीण व भावाला घेन मूर्तिजापूर
Ajitpawar / राज्यातील कर्जमाफी संकट: अजित पवारांचे विधानवर काँग्रेसची टीका
पोटच्या अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
पोलिस स्टेशन हद्दीत राहण्यास आला आणि त्यावेळेस त्यांची आइ वेगळ्या गावी राहत होती. तिथे राहत असताना आरोपी याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. म्हणून आरोपी नराधम वडील यांच्या अल्पवयीन पीडित मुलीने आरोपीविरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार दिली.
सदर तक्रारीवरून सदर पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (३), ५०६ सह पोक्सो कायद्याचे कलम ४, ५ (१), ५ (एन) सह कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अतिरिक्त शिक्षेचे केले प्रावधान !
सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला भादंवि ३७६ (३) अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड रक्कम न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच भादंवि कलम ५०६ अंतर्गत ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील अॅड. श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी संतोष आबिलवादे यांनी सहकार्य केले.
Courtnews:या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपास अधिकारी यांनी आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण सहा साक्षीदार तपासले.