प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करत वर्धा, वरोरा व बुटीबोरी परिसरातील एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.wardhanews
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सावंगी मेघे येथील विजय लॉन्स परिसरात राहणारे रोहित विलासराव चंदनखेडे (वय २५) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी पत्नी व मुलासह दुपारी घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने बंद घरात प्रवेश करून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (किंमत २४ हजार रुपये) व रोख ४५ हजार रुपये असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.hingnghatnews
गुन्हा अज्ञात आरोपीने केल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे विशाल राम गायकवाड (रा. कैकाडी नगर, नागपूर) व त्याचे साथीदार घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. नागपूर येथील बर्डी मार्केट परिसरातून दोन वाहनांसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची नावे विशाल उर्फ बबलू राम गायकवाड (वय २२), आदित्य राम गायकवाड (वय २०) अशी असून, दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चौकशीत आरोपींनी देवळी, वर्धा शहर, सेवाग्राम, वरोरा (जि. चंद्रपूर) व बुटीबोरी (जि. नागपूर) येथील घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपींकडून एकूण सहा घरफोडीचे गुन्हे उघड करून १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Wardhanews /ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.








